What is engineering? How to do – qualitystudymaterial.in

What is engineering? How to do

अश्या अनेक प्रकारची प्रश्न १२ वि झालेल्या मुलांच्या डोक्यात चालू असतात. इंजिनीरिंग करायचा विचार असा डोळे झाकून करू नका . प्रश्न विचारा माहिती घ्या  आधी विचार करा कि मला भविष्यात काय करायचंय . या प्रश्नच उत्तर जितकं महत्वाचं आहे तितकीच मेहनत करण्याची इच्छाशक्ती , अभ्यासाची जिद्द , धेर्य , सहनशक्ती असेल तरच आपल्याला एक उत्तम इंजिनिअर बनता येऊ शकेल.  

फक्त इंजिनीरिंग करायची असं म्हणून खूप जण इंजिनीरिंग घेतात . आणि त्यांना इंजिनीरिंग घेतल्या नंतर समजते कि , आपण फसलो आहोत हि माझी दिशा नाहीये आणि मी जे करतोय त्याला पुढे किंमत नाहीये . असे त्यांना वाटू लागते . आणि मधेच विद्यार्थी कॉलेज ड्रोपॉउट करून दुसरा कोर्स निवडतात . त्यामुळे वर्षे वाया घालण्यापेक्षा एकदाच चांगला विचार करून कोर्स निवडा.

Credit – Naukri.com

१२ वि झाल्यानंतर बहुदा असं होत कि , माझा कल कश्यात आहे हे त्यांच्या लक्षात येत नसते . म्हणून विद्यार्थ्यांना गरज असते ती योग्य मार्गदर्शनाची . बऱ्याच इंजिनीरिंग घेतलेल्या विद्यार्थ्यांना माहित नसते कि या शाखेला पुढे जाऊन काय महत्व आहे . 

 

 

चला मग इंजिनीरिंग काय आहे ? कशी करायची ? हे माहित करून घेऊया . 

मेकॅनिकल इंजिनिअर :

कोणत्याही मशिनीचे काम असलेकी तिथे लागतो मेकॅनिकल इंजिनिअर .  मेकॅनिकल इंजिनिअर ला औद्योगिक क्षेत्रात मोट्या प्रमाणात मागणी आहे . हा कोर्स ४ वर्षचा असतो . हा कोर्से केल्यावर आपल्याला विविध अश्या क्षेत्रात काम करण्याच्या संधी उपलब्ध होतात . आपण आपले छोट्या पासून ते मोठ्या वोर्कशॉप चालू करू शकतो . शासकीय आणि खाजगी विभागातही विविध संधी  मेकॅनिकल इंजिनिअर ला उपलब्ध आहेत .

सिव्हील इंजिनिअर :

सिव्हील इंजिनिअर ना शासकीय आणि खाजगी क्षेत्रात मोट्या प्रमाणात मागणी आहे . हा कोर्स ४ वर्षाचा असतो . इमारती, रस्ते , धरण , तसेच बांधकाम व्यवसायात सिव्हील इंजिनिअर ला वाव आहे . तसेच एमपीएससी आणि युपीएससी या दोन्ही क्षेत्रात इंजिनिअर ला वाव आहे . 

इलेक्ट्रिकल इंजिनिअर :

इलेक्ट्रिकल इंजिनिअर हा कोर्स ४ वर्षाचा असतो . जिथे जिथे कॅनेकशन किंवा विजेचा विषय येतो त्या क्षेत्रात इलेक्ट्रिकल इंजिनिअर यांना मोट्या प्रमाणात मागणी आहे . कॉन्ट्रॅक्टर , प्रोजेक्टर प्लांनिंग , खाजगी काम या क्षेत्रात आपण  करू शकता .

इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर :

इलेकट्रोनिक इंजिनिअर ला सॉफ्टवेअर कंपनी मध्ये मोट्या प्रमाणात मागणी आहे . हा कोर्स ४ वर्षाचा असतो . मोट्या शहरात मोट्या  काम करण्याची संधी इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर ला उपलब्ध होते . 

कंप्यूटर इंजिनिअर :

कंप्यूटर इंजिनिअर ला अनेक सॉफ्टवेअर कंपनी तसेच अनेक कॉम्पुटर क्षेत्रात नोकरी करण्याची संधी उपलब्ध होते . हा कोर्से देखील ४ वर्षचा असतो . कंप्यूटर इंजिनिअला परदेशात मोठ्या प्रमाणात मागणी आहे.

Leave a Comment